Video : निलेश राणेंकडून केसरकरांना ड्रायव्हरपदी काम करण्याची ऑफर!, पाहा...

Video : निलेश राणेंकडून केसरकरांना ड्रायव्हरपदी काम करण्याची ऑफर!, पाहा…

| Updated on: Aug 07, 2022 | 11:20 AM

नारायण राणे (Narayan Rane) आणि दीपक केसरकर यांच्यातील वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “दीपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, 1 तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे!”, असं ट्विट करत निलेश राणेंनी केसरकरांवर […]

नारायण राणे (Narayan Rane) आणि दीपक केसरकर यांच्यातील वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “दीपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, 1 तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे!”, असं ट्विट करत निलेश राणेंनी केसरकरांवर शाब्दिक हल्ला केलाय. दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणेंवर थेट आरोप केले. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंची बदनामी करण्यात आली. नारायण राणेंच्या कुटुंबाकडून आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा प्रयत्न झाला, असं त्यांनी म्हटलं. त्यावर आता विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहे. निलेश राणेंनी तर आक्रमक शैलीत त्यांना प्रत्युत्तर दिलंय.

Published on: Aug 07, 2022 11:20 AM