Special Report | मुंबई महापालिकेत कुणाची 'हंडी' फुटणार?

Special Report | मुंबई महापालिकेत कुणाची ‘हंडी’ फुटणार?

| Updated on: Aug 18, 2022 | 11:41 PM

दहिहंडीच्या निमित्तानं शेलारांनी शिवसेनेला आव्हान दिल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. हिंमत असेल तर आशिष शेलारांनी वरळीतून निवडणूक लढवावी असं आव्हान सचिन अहिर यांनी दिलंय. मुंबई महापालिकेत भाजपचाच महापोर बसवण्याचा निर्धार प्रसाद लाड यांनी केलाय. दहिहंडीच्या निमित्तानं भाजपनं शिवसेनेविरोधात एल्गार पुकारलाय.

मुंबई : शिवसेनेचा बालेकिल्ला आणि आदित्य ठाकरेंचा(Aditya Thackeray) मतदारसंघ असलेल्या वरळीत भाजपनं भव्य दहिहंडी स्पर्धेचं आयोजन केलंय. एकीकडे भव्य दहिहंडीची(Dahihandi) तयारी आणि दुसरीकडे खोचक ट्विट करत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी(aashish shelar) शिवसेनेला डिवचलंय. ज्या वरळीत सेनेच्या खासदार, आमदार, माजी मंत्री, माजी महापौर आणि नगरसेवक असे नेत्यांचे थरावर थर आहेत, तिथे म्हणे पक्षाला द्यायच्या 100 रुपयांच्या शपथपत्राला बळ अपुरं पडतंय. दुसरीकडे भाजपची जांबोरी मैदानातली दहिहंडी मुंबईकरांच्या प्रचंड प्रतिसादाने लक्षवेधी ठरतेय. भाजपच्या मतांवर निवडून यायचं आणि उगाच आमचा गड, आमचा गड म्हणून मिरवायचं. आता बघा, सगळे कसे गडगडायला लागलेयत. भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांचे थर कोसळायला लागलेयत. लवकरच मुंबईकरच वरळीतून कोसळणाऱ्या थरांचा थरार निवडणुकीत ‘करुन दाखवतील’. आमचं ठरलंय! असं ट्विट शेलारांनी केलंय. दहिहंडीच्या निमित्तानं शेलारांनी शिवसेनेला आव्हान दिल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. हिंमत असेल तर आशिष शेलारांनी वरळीतून निवडणूक लढवावी असं आव्हान सचिन अहिर यांनी दिलंय. मुंबई महापालिकेत भाजपचाच महापोर बसवण्याचा निर्धार प्रसाद लाड यांनी केलाय. दहिहंडीच्या निमित्तानं भाजपनं शिवसेनेविरोधात एल्गार पुकारलाय. शिवसेनेनंही भाजपचं आव्हान स्वीकारलंय. येत्या काही महिन्यात कित्येक हजार कोटी बजेट असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. या निवडणुकीत कोण कुणाची हंडी फोडणार हेच पाहावं लागेल.

Published on: Aug 18, 2022 11:41 PM