पंकजा मुंडे भाजप सोडणार? राष्ट्रवादीच्या नेत्याची खुली ऑफर; म्हणाला…
त्यातच त्यांनी भाजप विषयी त्यांच्या मनात असणारी खदखद बोलून दाखवली. यावेळी मुंडे यांनी मी भाजपात आहे. भाजप थोडीच माझा आहे, असं विधान केलं त्यामुळे एकच खळबळ उडाली. तर गरज पडली तर भावाचं म्हणजेच महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आहेच असं म्हटलं. त्यामुळे त्या आता भाजप सोडणार असं बोललं जात आहे.
नागपूर : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यातच त्यांनी भाजप विषयी त्यांच्या मनात असणारी खदखद बोलून दाखवली. यावेळी मुंडे यांनी मी भाजपात आहे. भाजप थोडीच माझा आहे, असं विधान केलं त्यामुळे एकच खळबळ उडाली. तर गरज पडली तर भावाचं म्हणजेच महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आहेच असं म्हटलं. त्यामुळे त्या आता भाजप सोडणार असं बोललं जात आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी मोठं विधान केलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे या राष्ट्रवादीत येणार का? असा सवाल केला जात आहे. अनिल देशमुख यांनी, जर मुंडे यांनी राष्ट्रवादीत येण्याचा विचार केला तर त्यावर विचार केला जाईल असे सुतोवाच केलं आहे. त्यामुळे सध्या अनेक चर्चांना उत आला आहे.