Video | माझ्या वीर शिवसैनिकांमुळे तुम्हाला दिल्ली दिसली, ते आज गुन्हेगार ठरले काय ? उद्धव ठाकरे गरजले

Video | माझ्या वीर शिवसैनिकांमुळे तुम्हाला दिल्ली दिसली, ते आज गुन्हेगार ठरले काय ? उद्धव ठाकरे गरजले

| Updated on: Jan 23, 2024 | 1:41 PM

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे राज्यव्यापी महाअधिवेशन नाशिक येथे सुरु आहे. या महाअधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी घणाघाती भाषण केले. भाजपाला दिल्ली आमच्या वीर आणि मर्द शिवसैनिकांमुळे दिसली आहे. तुमच्या पुचाट भाजपा कार्यकर्त्यांमुळे दिसलेली नाही अशी झोंबरी टीका ठाकरे यांनी भाजपावर केली आहे.

नाशिक | 23 जानेवारी 2024 : नाशिक येथील राज्यव्यापी महाअधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर कठोर शब्दात टीका केली आहे. माझे हे शिवसैनिक मला वारसाहक्काने मिळालेले आहेत. चोरून मिळालेले नाहीत. भले ही माझी घराणेशाही असेल. माझ्या घराण्याच्या वारशाने ती मला मिळालेली आहे. मोदी पंतप्रधान व्हावे यासाठी आम्ही सुद्धा प्रचार केला होता. त्यावेळी आम्ही तुम्हाला गुन्हेगार वाटत नव्हतो का ? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. वर्षानुवर्षे आमच्या शिवसैनिकांनी खस्ता खाल्ल्याने तु्म्हाला दिल्ली दिसली आहे. तुमच्या पुचाट भाजपावाल्यांमुळे दिसलेली नाही असाही घणाघात उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. जेव्हा मुंबईत दंगल पेटलेली होती. तेव्हा आम्ही विचारत बसलो नाही की तुम्ही भाजपवाले का ? आज तुम्ही राजकारणात खोटे आरोप माझ्या शिवसैनिकांवर लावत आहात काय ? असा सवाल त्यांनी केला.

Published on: Jan 23, 2024 01:40 PM