पंकजा मुंडे आल्यानंतर कोणासाठी धोक्याचे ठरणार? सुषमा अंधारे यांचा कोणाला इशारा

पंकजा मुंडे आल्यानंतर कोणासाठी धोक्याचे ठरणार? सुषमा अंधारे यांचा कोणाला इशारा

| Updated on: Jul 08, 2023 | 9:44 AM

त्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा रंगली आहे. तर त्या भाजपवर नाराज दिसत आहेत. यासर्व बाबींवर त्यांनी काल आपली प्रतिक्रिया स्पष्ट करताना आपण बाजपवर नाराज नसल्याचे सांगितलं. तसेच सध्याच्या राजकारणाचा कंटाळा आल्याने दोन महिने सुट्टीवर जात असल्याचे सांगितलं.

पुणे : भाजप-शिवसेना सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एन्ट्रीने अनेकांच्यात अस्वस्थता दिसून येत आहे. तशीच काहीशी अस्वस्थतता पंकजा मुंडे यांच्यातही दिसत आहे. तर त्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा रंगली आहे. तर त्या भाजपवर नाराज दिसत आहेत. यासर्व बाबींवर त्यांनी काल आपली प्रतिक्रिया स्पष्ट करताना आपण बाजपवर नाराज नसल्याचे सांगितलं. तसेच सध्याच्या राजकारणाचा कंटाळा आल्याने दोन महिने सुट्टीवर जात असल्याचे सांगितलं. त्यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधला आहे. विधान परिषदेसाठी दोन वेळा उमेदवारी अर्ज भरण्याच्या पंकजा मुंडे यांच्या विधानावरून त्यांनी फडणवीस यांना इशारा दिला आहे. त्यांनी, मुंडे यांना शह देण्यासाठी म्हणून जाणीवपूर्वक विधान परिषदेवर रमेश आप्पा कराड आणि राज्यसभेवर भागवत कराड अशी दोन वंजारी समुदायातली नावं भाजपने ठरवून पुढे आणली. तर ही दोन्ही नावे मराठवाड्यातलीच आहेत. रमेश आप्पा लातूरचे तर भागवत कराड नांदेडचे आहेत. हे दोन नाव ठरवून पुढे आणत मुंडे यांना चेकमेट करण्याचा तो प्रयत्न आहे. पण दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेबांचा संघर्षाचा वारसा आणि वंजारी समुदाय खंबीरपणे त्यांच्या पाठीशी असल्याने त्या दोन म्हिन्यानंतर खूप स्ट्रॉंगली परत येतील. मात्र त्यांच्या परत येणं ही देवेंद्रजींच्यासाठी एक धोक्याची घंटा असेल असेही त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Jul 08, 2023 09:44 AM