‘मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे दिल्लीचे हस्तक’; दिल्ली वाऱ्यावरून काँग्रेस नेत्यानं शिंदे-फडणवीस यांना सुनावलं
आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. यावरून आता ठाकरे गटासह काँग्रेसने टीका केली आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे दिल्लीचे हस्तक आहेत अशी टीका केली आहे.
भंडारा : राज्यातील भाजप-शिवसेना सरकारला एक वर्ष पूर्ण होत असताना राज्य मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तार अजूनही झालेला नाही. यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जावून याच्याआदीही चर्चा केली आहे. मात्र यावर अजूनही काही ठरलेलं दिसत नाही. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. यावरून आता ठाकरे गटासह काँग्रेसने टीका केली आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे दिल्लीचे हस्तक आहेत अशी टीका केली आहे. तर दिल्ली वारीवरून शिंदे-फडणवीस यांनी टोला लगावताना यांच्या दिल्ली वाऱ्या पाहिल्या तर एक पाय महाराष्ट्र दुसरा पाय दिल्लीत असल्याचं म्हटलं आहे. तर मंत्रिमंडळाचा विस्तार न होणे हा लोकशाहीचा खऱ्या अर्थाने घात असल्याची टीका त्यांनी केली आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे दिल्लीत जाऊन मुजरेगिरी करतात असा घणाघात त्यांनी केला आहे.