आजपासून भाजप-शिवसेनेच्या आशीर्वाद यात्रेला सुरुवात; रॅलीची सुरुवात कुठून? पाहा...

आजपासून भाजप-शिवसेनेच्या आशीर्वाद यात्रेला सुरुवात; रॅलीची सुरुवात कुठून? पाहा…

| Updated on: Mar 05, 2023 | 10:18 AM

BJP Shivsena Ashirwad Yatra : भाजप-शिवसेनेच्या आशीर्वाद यात्रेला आज रविवारपासून सुरुवात होणार आहे. आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील जांबोरी मैदानापासून आशीर्वाद यात्रेची सुरुवात होणार आहे. पाहा...

मुंबई : भाजप-शिवसेनेच्या आशीर्वाद यात्रेला मुंबईत आज रविवारपासून सुरुवात होतेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप आणि शिवसेनेचे इतर नेतेही या यात्रेत सहभागी होणार आहेत. मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांच्यासह राज्यातील मंत्री, खासदार, आमदार आणि दोन्ही पक्षांचे नेते-पदाधिकारी या यात्रेत सहभागी होणार आहेत. एकनाथ शिंदे गटाला निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यावर जनजागृती करण्यासाठी आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला प्रत्युत्तर देण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत आहे. मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघांत भाजप-शिवसेनेकडून दुचाकी फेरीच्या माध्यमातून आशीर्वाद यात्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील जांबोरी मैदानापासून आशीर्वाद यात्रेची संध्याकाळी पाच वाजता सुरुवात होणार आहे. तर रात्री नऊ वाजता मुंबादेवी इथे समारोप होणार आहे.

Published on: Mar 05, 2023 10:18 AM