२४ तासाच्या आत माफी मागा, नाहीतर… संजय राऊत यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजप नेत्याचं थेट आव्हान
VIDEO | संजय राऊत यांनी केलेल्या 'त्या' वक्तव्यावर भाजप नेत्याची सडकून टीका
नाशिक : शनिवारी इतर धर्मियांच्या काही तरूणांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात आत शिरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मंदिर प्रशासनाने केलाय. त्यानंतर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र कोणीही त्र्यंबक मंदिरात घुसल्याची माहिती नाही. मंदिर प्रशासनावर दबाव आणून पत्र द्यायला लावलं. त्यांनीच आज त्र्यंबकेश्वरला बंद करायला सांगितलं आहे. ऊरूस उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संदलची परंपरा 100 वर्षांची आहे. मंदिराच्या दारावर देवाला धूप दाखवून पुढे जातात. देशात या परंपरा सर्वत्र आहेत, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. यावर भाजपकडून राऊतांचा जोरदार समाचार घेण्यात आला आहे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलंय, नुसतं हिंदुत्व नाही तर संजय राऊत यांनी हिंदू धर्म सुद्धा सोडला आहे. त्र्यंबकेश्वक मंदिरातील सर्व विश्वस्त, पुरोहितांपासून मंदिर व्यवस्थापन सांगताय की, अशी कोणतीही प्रथा, परंपरा या त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात नाही आणि तरी देखील संजय राऊत म्हणताय, १०० वर्ष जुनी परंपरा आहे. याचा अर्थ ते हिंदूंची अवलाद नाही आणि जर ते असतील तर त्यांनी ते सिद्ध करावं, असे भाजपचे अध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार भोसले यांनी म्हटलं आहे. यासह त्यांनी संजय राऊत यांना थेट आव्हान देखील दिले आहे. ते म्हणाले, २४ तासाच्या आत माफी मागा, नाहीतर याचे गंभीर परिणाम उद्धव ठाकरे यानी भोगायला तयार रहा.