‘त्या’ वक्तव्यावरून संजय शिरसाट यांनी टोचले बावनकुळे यांचे कान
शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी बावनकुळे यांनी त्यांच्या आधिकारात जे आहे ते बोलावे असे म्हणत कान टोचले आहेत.
मुंबई : येत्या वर्षभरात राज्याच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होईल. याच्याआधी आता कोणाला किती जागा द्यायाच्या यावर बैठका सुरू झाल्या आहेत. मविआने बैठक घेत आपला विधानसभा निवडणुकाचा फॉर्म्युला घोषित केला. त्यापाठोपाठ भाजप-शिंदे युतीचा देखिल जागा वाटपाचा फॉर्म्युला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषित केला आणि एकच खळबळ उडाली.
त्यानंतर आता शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी बावनकुळे यांनी त्यांच्या आधिकारात जे आहे ते बोलावे असे म्हणत कान टोचले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे गटाला 48 जागा तर भाजप 240 जागा असे गणित स्पष्ट केलं होते. त्यावर आम्ही काही मुर्ख आहोत का 48 जागा लढवायला? बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्याला काही आधिकार नाही. बावनकुळे यांनी आतिउत्साहात केलेले ते वक्तव्य आहे.
जागावाटपाचा निकाल हा वरिष्ठ पातळीवर होत असतो. त्यामुळे त्यांनी त्यांच्या आधिकारात जे आहे ते बोलावे. अशा वक्तव्यामुळे युतीत काही तनाव होईल यांचे भान त्यांच्या ठेवावे असे खडे बोल देखील शिरसाट यांनी सुनावले आहेत.