काँग्रेस विरोधी पक्षनेता का निवडत नाही? चंद्रशेखर बावनकुळे यांनी कारण केलं स्पष्ट
तर पावसाळी अधिवेशन देखील सुरू आहे. मात्र विधीमंडळात विरोधकांना अजूनही विरोधी पक्षनेता मिळालेली नाही. तर त्यांनी अजूनही तो निवडलेला नाही. तर विरोधी पक्ष नेता हा काँग्रेसचा होईल असं बोललं जात आहे.
मुंबई, 27 जुलै 2023 | राज्यातील राजकारणात आणि सत्तेत मोठे बदल झाले आहेत. महाविकास आघाडीचा विरोधी पक्षनेताच फुट्याने आता विरोधकांच्या समोर पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश करून आता एक महिना होत आहे. तर पावसाळी अधिवेशन देखील सुरू आहे. मात्र विधीमंडळात विरोधकांना अजूनही विरोधी पक्षनेता मिळालेली नाही. तर त्यांनी अजूनही तो निवडलेला नाही. तर विरोधी पक्ष नेता हा काँग्रेसचा होईल असं बोललं जात आहे. याचवरून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. तर याच्याआधी शिवसेना, राष्ट्रवादीतून विरोधी पक्ष नेताच फुटल्याने आता काँग्रेसमध्येही या भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेता निवडीला विलंब होत असल्याचा घणाघात बावनकुळे यांनी केला. तर निवडलेला विरोधी पक्ष नेता हा भाजप किंवा सत्ताधारी पक्षात उडी मारून जाईल की काय म्हणूनच ती विवड होत नाही. तर काँग्रेस २०२४ पर्यंत विरोधी पक्ष नेता निवडणारच नाही असा दावा देखील बावनकुळे यांनी केला आहे. Maharashtra Politics