पंकजा यांच्या वक्तव्यावर भाजप नेत्यानं सुनावलं; ''महाराष्ट्रात संभ्रम निर्माण करणं चूकीचं''

पंकजा यांच्या वक्तव्यावर भाजप नेत्यानं सुनावलं; ”महाराष्ट्रात संभ्रम निर्माण करणं चूकीचं”

| Updated on: Jun 01, 2023 | 2:29 PM

भाजप थोडीच माझा आहे, असं विधान केलं त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर आता राज्यात त्यांचाबाबत अनेक चर्चा होताना दिसत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेतर ऑफरच दिली आहे. तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

नागपूर : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी भाजप विषयी त्यांच्या मनात असणारी खदखद बोलून दाखवली. यावेळी त्यांनी, मी भाजपात आहे. भाजप थोडीच माझा आहे, असं विधान केलं त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर आता राज्यात त्यांचाबाबत अनेक चर्चा होताना दिसत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेतर ऑफरच दिली आहे. तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी समोर येत यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा संपूर्ण विपर्यास केला गेला. मी त्यांचा संपूर्ण भाषण ऐकलेलं आहे. पंकजाताई यांनी भाजप बद्दल बोलताना पक्ष माझ्या पाठीशी आहे असे वक्तव्य केले आहे. तर पंकजाताई भाजपच्या नेत्या आहेत. त्यांच्या बोलण्याचा नेहमीच विपर्यास केला जातो. त्यामुळे कोणत्याही विषयाला धरून त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात संभ्रम निर्माण करणे चूकीचं असल्याचंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

Published on: Jun 01, 2023 02:29 PM