राहुल गांधीच्या मुद्द्यावरून बावनकुळे यांची ठाकरेंवर खरमरीत टीका
लोकशाही वाचविण्याच्या लढाईत आम्ही सोबत आहोत. मात्र सावरकर आमचं दैवत आहे. त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना दिला होता.
इंदापूर : मालेगाव येथील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी काँग्रेसनेते राहुल गांधी यांना देखिल इशारा दिली. तसेच लोकशाही वाचविण्याच्या लढाईत आम्ही सोबत आहोत. मात्र सावरकर आमचं दैवत आहे. त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. ठाकरे यांच्या या इशाऱ्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आवाहन केलं आहे. बावनकुळे यांनी हिंमत असेल तर आपण काँग्रेसला सोडाला असं जाहीर करा असं म्हटलं आहे.
सावरकरांचा मुद्द्यावरून राज्यासह देशात भाजप आंदोलन करत आहे. पण उद्धव ठाकरे यावर काही बोलले नाही. त्यावर त्यांनी काल इशारा दिला. उद्धव ठाकरेंची बुद्धी भष्ट झाली आहे. राहुल गांधी रोज सावरकरांचा अपमान करतात दे दिसत नाही का? मग स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस पार्टीला सोडत का नाहीत. त्यांचा हा ढोंगीपणा आहे. उद्धव ठाकरे यांना जर एवढं वाटत असेल तर त्यांना आव्हान आहे की त्यांनी उद्या सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घ्यावी आणि महाविकास आघाडीला सोडावं, आणि वेगळं दुकान मांडावं.