लोकसभेच्या राज्यात भाजपला किती जागा? बावनकुळेंनी आकडाच सांगितला
विरोधकांसह एकास एक असा फार्म्युला ठरवला गेला असतानाच भाजपनेही आपली कंबर कसली आहे. याचपार्श्वभूमिवर राज्यात देखील भाजपकडून लोकसभा मतदार संघनिहाय बैठका आयोजित केल्या जात आहेत. तर अनेक ठिकाणी सभांचे आयोजन होत आहे.
चंद्रपूर : आगामी लोकसभेच्या निवडणुकिवरून सध्या राज्यासह देशातही जोरदार तयारी केली जात आहे. विरोधकांसह एकास एक असा फार्म्युला ठरवला गेला असतानाच भाजपनेही आपली कंबर कसली आहे. याचपार्श्वभूमिवर राज्यात देखील भाजपकडून लोकसभा मतदार संघनिहाय बैठका आयोजित केल्या जात आहेत. तर अनेक ठिकाणी सभांचे आयोजन होत आहे. कार्यकर्ता मेळावे भरवले जात आहेत. अशाच एका कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी चंद्रपूर हा वाघांचा जिल्हा आहे. येथे डरकाळी जरी फोडली तरी राज्यात 48 पैकी 45 जागा भाजपच्या निवडूण आणू असा विश्वास व्यक्त केला आहे.
Published on: Jun 26, 2023 10:24 AM
Latest Videos