‘अजित पवार, छगन भूजबळ…’ भाजप नेत्याचा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष निवडीवरून निशाना
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 व्या वर्धापन दिनी अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली. त्यावरून सध्या विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर अन्याय झाल्याचं भाजपकडून बोललं जात आहे.
नांदेड : आगामी लोकसभा आणि महापालिकांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवत सगळेच पक्ष आता कामाला लागले आहेत. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 व्या वर्धापन दिनी अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली. त्यावरून सध्या विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर अन्याय झाल्याचं भाजपकडून बोललं जात आहे. त्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर निशाना साधला आहे. त्यांनी काल जो वर्धापन दिनी साजरा करण्यात आला त्या पक्षाचीच राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता काढण्यात आळी आहे. असे असताना ते वर्धापन दिन साजरा करतात हिच हास्यास्पद बाब असल्याचा टोला लगावला आहे. तर ज्या निवडी झाल्या तो त्यांचा पक्षाचा भाग आहे. मात्र जर अजित पवार आणि छगन भुजबळ यांची निवड झाली असती तर किमान राज्यात चांगले दिवस पक्षाला बघायला मिळाले असते.