VIDEO | वडेट्टीवार यांच्या ‘त्या’ दाव्यावर बावनकुळे भडकले; म्हणाले, ‘मी ठासून सांगतोय…’
राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून मोठा दावा केला होता. तर सप्टेंबर महिन्यात राज्यात उलाथापालथ होईल असे त्यांनी म्हटलं होतं. त्यावरून भाजप नेत्याने पलटवार केलाय.
मुंबई : 19 ऑगस्ट 2023 | विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सप्टेंबर महिन्यात राज्याच्या सत्तेमधली मुख्य खुर्ची बदलणार असा दावा केलाय. मुख्य खुर्चीपासून सत्ता बदलण्यास सुरूवात होईल असा दावा देखील त्यांनी केला. त्यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे. तर यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वडेट्टीवार यांना थेट खडसावलं आहे. तर पद मिळालं म्हणून वडेट्टीवारांनी काहीही बोलू नये असा दम दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी वडेट्टीवार यांनी केलेल्या त्या वक्तव्यावरून एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री राहतील अस ठासून सांगत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तर वडेट्टीवार यांनी मी सांगून ठेवतोय, सप्टेंबर महिन्यात मुख्य खुर्चीपासून सत्ता बदलण्यास सुरूवात होईल असं वक्तव्य केल होतं. त्यावर बावनकुळे यांनी म्हटलंय की, तुम्ही सांगून ठेवताय पण मी ठासून सांगतोय, आमच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि आमच्या फडणवीस यांनी हे स्पष्ट केलंय की २०२४ पर्यंत शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार आहे.