बावणकुळे यांच्या इंदापुरमध्ये झालेल्या सभेवर राष्ट्रवादीच्या नेत्याची खरमरीत टीका, 'तो' कार्यक्रम गुंडांच्या टोळीचा

बावणकुळे यांच्या इंदापुरमध्ये झालेल्या सभेवर राष्ट्रवादीच्या नेत्याची खरमरीत टीका, ‘तो’ कार्यक्रम गुंडांच्या टोळीचा

| Updated on: Mar 30, 2023 | 12:02 PM

पवार नावाची किड या महाराष्ट्राला लागली आहे. ती मुळापासूनच काढून टाकावी लागावी लागेल. तरच तुम्हाला न्याय मिळेल, अशाप्रकारचे वक्तव्य करत पडळकर यांनी पवार यांच्यावर जहरी टीका केली

इंदापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची इंदापूरमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत मविआसह उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात आली. याच सभेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्यापातळीवर जात टीकास्त्र डागले. पवार नावाची किड या महाराष्ट्राला लागली आहे. ती मुळापासूनच काढून टाकावी लागावी लागेल. तरच तुम्हाला न्याय मिळेल, अशाप्रकारचे वक्तव्य करत पडळकर यांनी पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. त्याच्यावर आता राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे यांनी निशाना साधला.

यावेळी भरणे यांनी, काल परवा येथे भाजपची सभा झाली. तस मला कोणाच्या सभांना जाव, ऐकावं असं वाटतं नाही. कुठतरी गुंडांचं, गुंडांच्या टोळीचं भाषण ऐकायचं नसतं असं ते म्हणाले.पण खुशाल लोकं टाळ्या वाजवतात. गुंडांच्या भाषणावर लोक टाळ्या वाजवतात. त्यामुळे कधी कधी तालुक्यातल्या लोकांचं वाईट वाटतं. पण जे गुंड लोक असतात त्यांचा कुठतरी समाचार हा घेतला पाहिजे म्हणून बोलतोय असेही भरणे म्हणाले.

Published on: Mar 30, 2023 12:01 PM