इंदापूरात सभा भाजपची, बोलणारे पडळकर चर्चा मात्र हर्षवर्धन पाटलांची
पडळकर यांनी, बारामती राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. येथे बोलावच लागेल. हर्षवर्धन पाटील इथं आहेत. आज ते आपलं नेतृत्व आहेत. बारामती लोकसभेचं तिकीटं कुणाला पार्टी देणार मला माहित नाही. पण ज्याला कोणाला देणार तो भाग्यवान असणार आहे असं म्हटलं आहे
इंदापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची इंदापूरमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली. पडळकर हे व्यासपीठावरून राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, अजित पवार आणि सुप्रीया सुळे यांच्यावर टीका करत असताना चर्चा मात्र हर्षवर्धन पाटलांची झाली. यावेळी पडळकर यांनी, बारामतीमध्ये भाजपचं तिकीट मिळवणारा माणूस भाग्यवान असणार आहे. पवार आणि सुळेंना पाडून लोकसभेत जाणारा तो भाग्यवान असेल असे म्हणत हर्षवर्धन पाटलांचे नाव घेतले. त्यामुळे सध्या इंदापूरात हर्षवर्धन पाटलांचीच चर्चा रंगली आहे.
पडळकर यांनी, बारामती राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. येथे बोलावच लागेल. हर्षवर्धन पाटील इथं आहेत. आज ते आपलं नेतृत्व आहेत. बारामती लोकसभेचं तिकीटं कुणाला पार्टी देणार मला माहित नाही. पण ज्याला कोणाला देणार तो भाग्यवान असणार आहे. कारण पवाराला पाडून तेथे जाण्याची संधी मिळणार आहे. कोणाचे ग्रहमान चांगले आहेत मला माहित नाही. माझे खराब होते. म्हणून डिपॉझिट जप्त झालं. तरिही मला भारतीय जनता पार्टीनं मला उभ केलं आणि मी पवारांच्या मालगुटीवर बसलो असे पडळकर म्हणाले.