आत्मपरीक्षण करा तुम्ही किती भट्टाचार केला; ठाकरे यांनी केल्या भाषणावर बावनकुळेंचं उत्तर
भ्रष्टाचारावर बोलणं तुम्हाला शोभत नाही. आत्मपरीक्षण करा तुम्ही किती भट्टाचार केला असा पलटवार बावनकुळे यांनी ठाकरे यांच्यावर केला आहे.
इंदापूर : मालेगाव येथे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली. त्या टीकेला आधी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उत्तर देत ठाकरे यांनी भाजपवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असं म्हटलं होतं. त्यानंतर उद्धव टाकरे यांच्या टीकेला उत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही दिलं आहे.
भाजपचे सरकार 9 वर्षांपासून केंद्रात आहे एक तरी भष्ट्राचाराचा आरोप आहे का असा सवाल त्यांनी केला आहे. तर उद्धव ठाकरे हेच भष्ट्राचारी आहेत. तर ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा धर्मच आहे की सत्तेत पैसा मिळवायचा त्यांच्याच मांडीवर जाऊन तुम्ही बसलाय. भ्रष्टाचारावर बोलणं तुम्हाला शोभत नाही. आत्मपरीक्षण करा तुम्ही किती भट्टाचार केला असा पलटवार बावनकुळे यांनी केला आहे.
Published on: Mar 27, 2023 07:46 AM
Latest Videos