अमित शाह यांना बावनकुळे यांच निमंत्रण; राष्ट्रवादी नेत्याची खोचक टीका; म्हणाला, ‘म्हणजे हे नेते अकार्यक्षम’
राष्ट्रवादीने नेते आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे. त्यांनी, बावनकुळे यांनी राष्ट्रवादी बद्दल किंवा शरद पवार यांच्याबद्दल जास्त काळजी करू नये. तर बावनकुळे यांना मंत्रिपद पाहिजे होतं. पण त्यांना ते मिळालेला नाही.
पुणे : भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सतत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत असतात. तसेच गेले काही दिवसांपासून आपण बारामतीचा किल्ला जिंकू असे म्हणत आहेत. त्यावरून राष्ट्रवादीने नेते आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे. त्यांनी, बावनकुळे यांनी राष्ट्रवादी बद्दल किंवा शरद पवार यांच्याबद्दल जास्त काळजी करू नये. तर बावनकुळे यांना मंत्रिपद पाहिजे होतं. पण त्यांना ते मिळालेला नाही. त्यामुळे भाजप पार्टीनं दाखवून दिलं की तुम्ही मंत्रीपदाच्या काबिल नाहीये असा आम्ही समजायचं का? असा सवाल केला आहे. तर राज्यात अमित शाहांनी पुन्हा यावं असं आमंत्रण बावनकुळे यांनी दिल्यावरूनही रोहित पवार यांनी, प्रत्येक महिन्याला महाराष्ट्रमध्ये महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये थेट केंद्रीय मंत्र्यांना बोलवावं लागतं म्हणजे महाराष्ट्रातील भाजपचे जे काही नेते आहेत ते अकार्यक्षम आहेत असेच म्हणावं लागेल असा टोला लगावला आहे.