भाजपच्या या खासदारांसाठी धोक्याची घंटा, कुणाचं तिकीट कापणार? भाजपचं मिशन लोकसभा काय?
VIDEO | आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटातून मोठी बातमी, सुमार कामगिरी असलेल्या भाजप खासदारांची तिकीट या पंचवार्षिक निवडणुकीत कापण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर काय आहे भाजपचं मिशन लोकसभा?
मुंबई, २७ सप्टेंबर २०२३ | आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून नव्या चेहऱ्यांची चाचपणी सुरू झालेली आहे. सुमार कामगिरी असलेल्या भाजप खासदारांची तिकीट या पंचवार्षिक निवडणुकीत कापण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लोकसभेसाठी भाजपकडून नव्या चेहऱ्यांची चाचपणी सुरू झालेली आहे. तर भाजपकडून मुंबईतही काही जागांवर बदल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. जे.पी नड्डा आणि अमित शाह यांच्या दौऱ्यात भाजप खासदारांच्या कामगिरींचा आढावा घेण्यात येत आहे. भाजपकडून प्रत्येक खासदारांचे रिपोर्ट कार्ड तयार करण्यात आले होते. यानंतर राज्यातील काही खासदारांवर केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याचे सांगितले जात होतं. त्यामुळे ज्यांची कामगिरी उत्तर नाही, अशा भाजप खासादारांसाठी यंदाच्या निवडणुकीसाठी धोक्याची घंटा असल्याची शक्यता आहे. भाजपला विजय मिळावा यासाठी भाजप तयारीला लागलं असून काय आहे भाजपचं मिशन लोकसभा?