आम्हाला तुरुंगात टाकतील, ठार मारतील, आमची तयारी मात्र पुढची 25 वर्ष भाजपची सत्ता येणार नाही – Raut

| Updated on: Apr 07, 2022 | 8:00 PM

आम्हाला ठार केलं तरी आमची तयारी आहे. या पुढे 25 वर्ष तुमची सत्ता येणार नाही याची व्यवस्था तुम्हीच करून ठेवली आहे. तुम्हीच तुमचती कबर तुम्हीच खोदली आहे. अशा प्रकारचं वर्तन सुरूच राहिलं तर ही कबर सुद्धा देशात खोदली जाईल, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपला दिला.

मुंबई: केंद्रीय तपास यंत्रणांच्या (central investigation team) माध्यमातून हल्ले केले जात आहेत. ते काय करू शकतात? ते आम्हाला तुरुंगात पाठवतील, माझी तयारी आहे. आमच्यावर खुनी हल्ला करा, आमची तयारी आहे. आम्हाला ठार केलं तरी आमची तयारी आहे. या पुढे 25 वर्ष तुमची सत्ता येणार नाही याची व्यवस्था तुम्हीच करून ठेवली आहे. तुम्हीच तुमचती कबर तुम्हीच खोदली आहे. अशा प्रकारचं वर्तन सुरूच राहिलं तर ही कबर सुद्धा देशात खोदली जाईल, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपला दिला. राजकीय विरोधकांना केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून उद्ध्वस्त करत असाल तर तुम्हीही त्यात भरडले जाल. विक्रांत घोटाळ्याचा (ins vikrant) सोमय्याला जाब विचारतील असं वाटलं होतं. पण त्यांच्या बाजूने उभे आहात हा निर्लज्जपणा आहे. त्यांच्याकडे पुरावे असू शकत नाही. कारण मी पुरावे दिले आहे, असा घणाघाती हल्लाही संजय राऊत यांनी केला.