धाराशिव लोकसभेवरून भाजपचा सावध पवित्रा; यूटर्न घेत राणा जगजीतसिंह पाटील म्हणाले...

धाराशिव लोकसभेवरून भाजपचा सावध पवित्रा; यूटर्न घेत राणा जगजीतसिंह पाटील म्हणाले…

| Updated on: Jun 14, 2023 | 12:03 PM

शिवसेनेचे मंत्री तानाजीराव सावंत यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर भाजपची सावध भुमिका घेतली आहे. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी धाराशिव येथे भाजपचा खासदार होईल असे वक्तव्य केले होते. त्यानंतर दोघात वाद पेटला होता. तानाजी सावंत यांनी धाराशिव लोकसभा ही जागा परंपरागत शिवसेनेची आहे, असे सांगत आक्रमक पवित्रा घेत दावा केला होता.

धाराशिव : शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर भाजपची सावध भुमिका घेतली आहे. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी धाराशिव येथे भाजपचा खासदार होईल असे वक्तव्य केले होते. त्यानंतर दोघात वाद पेटला होता. तानाजी सावंत यांनी धाराशिव लोकसभा ही जागा परंपरागत शिवसेनेची आहे, असे सांगत आक्रमक पवित्रा घेत दावा केला होता. यावर आता भाजपने सावध पवित्रा घेत यु टर्न घेतला. “भाजप व शिवसेना पक्षाचे केंद्रीय नेतृत्व धाराशिव जागेबाबतचा अंतिम निर्णय घेणार आहेत, त्यामुळे जी चर्चा आहे त्याला पूर्णविराम आहे. अंतिम निर्णय नेते घेतील, त्याप्रमाणे सर्वजण अंमलबजावणी करतील, असे आमदार राणा पाटील म्हणाले.

Published on: Jun 14, 2023 12:03 PM