महापालिकेच्या स्थायी सभापती निवडीत भाजपचे धीरज सुर्यवंशी नऊ मतांनी विजयी
सूर्यवंशी समर्थकानी गुलालाची उधळण व फाटक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. सूर्यवंशी यांची संपूर्ण सांगली शहरातून मिरवणूक काढली. जे पेराल तेच उगवेल अशी प्रतिक्रिया धीरज सूर्यवंशी यांनी दिली आहे.
महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी भाजपचे धीरज सूर्यवंशी यांची निवड झाली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे संतोष पाटील यांचा त्यांनी नऊ विरुध्द पाच मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीचे पवित्रा केरीपाळे व संगीता हारगे हे दोन सदस्य गैरहजर राहिले. त्यामुळे आघाडीच्या पाटील यांना पराभव झाला. काँग्रेसचे उमेदवार संतोष पाटील यांना केवळ पाच मतं पडली आहेत. सूर्यवंशी समर्थकानी गुलालाची उधळण व फाटक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. सूर्यवंशी यांची संपूर्ण सांगली शहरातून मिरवणूक काढली. जे पेराल तेच उगवेल अशी प्रतिक्रिया धीरज सूर्यवंशी यांनी दिली आहे.
Published on: Sep 15, 2022 08:57 AM
Latest Videos