Ambadas Danve: महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा भाजपाचा डाव, महापालिका निवडणुकांवरुन दानवेंचा आरोप

Ambadas Danve: महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा भाजपाचा डाव, महापालिका निवडणुकांवरुन दानवेंचा आरोप

| Updated on: Aug 20, 2022 | 7:44 PM

एवढेच नाहीतर मुंबईला महाराष्ट्रापासून आणि विदर्भ वेगळा करण्यासाठी भाजप कोणत्याही स्तराला जाऊ शकते हे सर्व मुंबईकरांना माहिती आहे. त्यामुळे अशा दाव्यांचा मुंबईकरांवर परिणाम होणार नाही. सर्वकाही राजकीय स्वार्थ साधण्यासाठीची धडपड असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.

मुंबई : दहीहंडीचा उत्सवापासून खऱ्या अर्थाने महापालिका निवडणुकांना सुरवात झाली असेत चित्र सध्याच्या आरोप-प्रत्यारोपावरुन दिसून येऊ लागले आहे. मुंबई महापालिकेत यंदाच्या निवडणुकानंतर भाजपाचाच महापौर असणार असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तर यावर शिवसेनेकडूनही टीकास्त्र सुरु झाले आहे. महापालिकेत भाजपाचा महापौर हे भाजपाचे 25 वर्षापासूनचे स्वप्न आहे. ते यंदा स्वप्नच राहणार असा टोला आंबादास दानवे यांनी लगावला आहे. तर दुसरीकडे मुंबईचे महत्व कमी करण्याच्या अनुशंगाने सर्वकाही घडवून आणण्याचा प्रयत्न भाजपाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. एवढेच नाहीतर मुंबईला महाराष्ट्रापासून आणि विदर्भ वेगळा करण्यासाठी भाजप कोणत्याही स्तराला जाऊ शकते हे सर्व मुंबईकरांना माहिती आहे. त्यामुळे अशा दाव्यांचा मुंबईकरांवर परिणाम होणार नाही. सर्वकाही राजकीय स्वार्थ साधण्यासाठीची धडपड असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.