Anil Bonde on Sanjay Raut | कोणी केला शिवसेना घात? काय म्हणाले अनिल बोंडे? कोणावर केली बोंडेंनी घणाघाती टिका

Anil Bonde on Sanjay Raut | कोणी केला शिवसेना घात? काय म्हणाले अनिल बोंडे? कोणावर केली बोंडेंनी घणाघाती टिका

| Updated on: Jul 17, 2022 | 4:15 PM

MP Anil Bonde : राज्यसभेतील भाजपचे नवनिर्वाचित खासदार अनिल बोंडे यांचा संजय राऊत यांच्यावर घणाघात, त्यांनी शिवसेनेचा घात केल्याचा आरोप केला.

MP Anil Bonde News : राज्यसभेतील भाजपचे नवनिर्वाचित खासदार अनिल बोंडे (Dr. Anil Bonde) यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर चांगलेच तोंडसूख घेतले. राऊत यांनी शिवसेनेचा घात केला. शिवसेनेचा मुळ गाभा बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakeray) यांच्या विचाराचा आहे. राऊत यांना काही दिवस अकलेचे तारे तोडू द्या अशी घणाघाती टीका डॉ. बोंडे यांनी केली. उद्यापासून संसदेचे अधिवेशन (Session) सुरु होत आहे, शिवसेनेतील खासदार (Shiv Sena MP) ही शिंदे गटात सहभागी होण्याची दाट शक्यतेवर बोलताना जे खासदार शिवसेनेचे असतील ते खऱ्या शिवसेनेत जातील असे सूचक विधान डॉ. बोंडे यांनी यावेळी केले. शिवसैनिक हा मुळ गाभ्याभोवती राहण्याचा प्रयत्न करतो. मुळ गाभा हा बाळासाहेबांच्या विचाराचा आहे. मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल या प्रश्नाला बगल देत त्यांनी हा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतली. पण केवळ हे दोघेच इतक्या ताकदीनं आणि वेगानं राज्याचा गाडा हाकत असल्याची पुस्ती जोडली.