Vinayak Raut | बंडखोरांच्या मदतीने शिवसेनेच्या खच्चीकरणाचा भाजपचा डाव, गद्दार त्याला बळी पडले,खासदार विनायक राऊत यांची घणाघाती टीका
Vinayak Raut | बंडखोरांच्या मदतीने शिवसेनेच्या खच्चीकरणाचा भाजपचा डाव असून दुर्दैवाने गद्दार या षडयंत्राला बळी पडल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला.
Vinayak Raut | बंडखोरांच्या मदतीने शिवसेनेच्या (Shivsena) खच्चीकरणाचा भाजपचा डाव असून दुर्दैवाने गद्दार (Rebel) या षडयंत्राला बळी पडल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला. शिंदे गटाने बंडाळी केली. हे सरकार भाजपच्या दावणीला बांधल्या गेले. भाजप बंडखोराच्या मदतीने शिवसेनेचे खच्चीकरण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
शिंदे सरकारचा याला पाठिंबा
वेदांताच नाही, तर एअर इंडियाचे कार्यालय आणि अन्य 9 कार्यालये गुजरातमध्ये पळवण्यात आले आहे. हे सर्व कार्यालये गुजरातला हलवताना शिंदे सरकारची त्याला मूक संमती असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. तर रत्नागिरी येथील रिफायनरी बाबत शिवसेना, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भूमिका पूर्वीपासून स्पष्ट आहे. त्यामुळे गद्दारांनी लोकांची दिशाभूल करु नये असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी दीपक केसरकर यांना लगावला.
Published on: Sep 16, 2022 01:17 PM
Latest Videos