बोर्डाच्या परिक्षेतील ‘कॉपी’ टाळण्यासाठी आधुनिक ट्रिक; पाहा नेमकं काय केलं जाणार?
दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील कॉपीला आळा घालण्यासाठी बोर्डानं महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. प्रश्नपत्रिकेच्या वाहतुकीवर GPS द्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. पाहा...
दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील कॉपीला आळा घालण्यासाठी बोर्डानं महत्वपूर्ण निर्णय घेतलाय.प्रश्नपत्रिकेच्या वाहतुकीवर GPS द्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. दहावी बारावीच्या परिक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. तसंच 10 मिनिटं आधी प्रश्नपत्रिका दिली जाणारी पद्धत आता बंद करण्याच आली आहे. त्याच वेळेला प्रश्नपत्रिकांच वाटप केलं जाणार आहे. उशीरा आलेल्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर प्रश्नपत्रिका आढळून आल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे 10 मिनीटं आधी प्रश्नपत्रिका दिली जाणारी पद्धत बंद करण्यात आली आहे. सकाळच्या सत्रात अर्धा तास आधी म्हणजे 10.30 वाजता परीक्षा केंद्रावर तर दुपारी 2.30 वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहणं बंधनकारक असणार आहे. तसं परिपत्रक बोर्डानं काढलं आहे.
Published on: Feb 11, 2023 09:10 AM
Latest Videos