बोक्याहो आम्ही पक्के खोकेवाले... भर सभेत गुलाबराव पाटील यांची तुफान फटकेबाजी

बोक्याहो आम्ही पक्के खोकेवाले… भर सभेत गुलाबराव पाटील यांची तुफान फटकेबाजी

| Updated on: Feb 17, 2023 | 8:04 AM

उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटावर ५० खोक्यांचा आरोप होत आहे. दरवेळी शिंदे गटावर टीका करण्यात येत आहे. त्याला आज शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी चांगलेच उत्तर दिले आहे. आमच्यावर लोक लय टीका करतात

जळगाव : उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटावर ५० खोक्यांचा आरोप होत आहे. दरवेळी शिंदे गटावर टीका करण्यात येत आहे. त्याला आज शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी चांगलेच उत्तर दिले आहे. आमच्यावर लोक लय टीका करतात. पाच, पंधरा जण १५ बोंबलत होते खोके खोके, आबे साले बोके हो आम्ही पक्के खोकेवाले आहोत. काय बोलायचे आहे ते बोला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारसंघात ३७० कोटी खोके निधी दिला आहे. जाऊन सांगा त्या राष्ट्रवादी काँग्रेसला असा टोला त्यांनी लगावला. जळगाव येथे विविध विकास कामाचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. आमचा उठाव जनतेसाठी आणि भगव्यासाठी होता. विरोधकांना आम्ही कामामधून उत्तर देऊ. हाथी चले बजार, कुत्ते भोके हजार, जो आम्हाला आडवा येईल त्याचा सत्यानाश होवो अशी टीकाही त्यांनी केली.