निशब्द! मरणानंतर ‘या’ अभिनेत्रीला 10 वर्षानंतर मिळणार न्याय! कोण आहे अरोपी?
विशेष बाब म्हणजे 10 वर्षांपुर्वीच जिया खान निशब्द या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आली होती. आणि आज 10 वर्षांनंतर तिच्यावर निकाल येणार आहे.
मुंबई : बॉलिवूड दिवंगत अभिनेत्री जिया खान 3 जून 2013 रोजी तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती. आत्महत्येनंतर अभिनेत्रीच्या घरातून सहा पानी सुसाईड नोट सापडली, जी जिया खान खानने लिहिलेली. यात जियाचा बॉयफ्रेंड सूरज पांचोलीवर बोट ठेवण्यात आला होता. तर सूरज पांचोलीवर हत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाचा अंतिम निकाल आज येणार आहे. त्यामुळे तब्बल 10 वर्षांनंतर दिवंगत अभिनेत्री जिया खानला न्याय मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या निकालाकडे संपुर्ण देशासह बॉलिवूडचे लक्ष लागले आहे. तर या प्रकरणात जिया खानची आई राबिया खान यांनीही याप्रकरणी सूरज पांचोली यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर, सूरज पांचोलीला 10 जून 2013 रोजी अटक करण्यात आली आणि दोन आठवड्यांहून अधिक काळ कोठडीत राहिल्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. होती. विशेष बाब म्हणजे 10 वर्षांपुर्वीच जिया खान निशब्द या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आली होती. आणि आज 10 वर्षांनंतर तिच्यावर निकाल येणार आहे.