घरगड्याचा कारणामा! सलामान खानच्या बहिणीच्या घरावरच केला हाथ साफ, हिऱ्याचे दागिन्यांवर मारला डल्ला; किमत पहा किती?
याप्रकरणी मुंबईतील खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी याप्रकरणाचा शोध घेतला असता याप्रकरणी पोलिसांनी 30 वर्षीय संदीप हेगडे याला अटक केली आहे.
मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार, भाईजान सलमान खानची बहिण अर्पिता खान शर्मा हिच्या खार इथल्या घरातून घरातून लाखो रुपये किमतीचे हिऱ्याचे दागिन्यांवर चोरांनी हाथ साफ केला. याप्रकरणी मुंबईतील खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी याप्रकरणाचा शोध घेतला असता याप्रकरणी पोलिसांनी 30 वर्षीय संदीप हेगडे याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्पिता हिच्या खार येथील घरातून मेकप ट्रे मधून हिऱ्याचे कानातले चोरी झाले होते. याप्रकरणी तिने खार पोलिसात गुन्हा दाखक केला होता. अधिक तापासांती संदीप हेगडे याचं नाव समोर आलं. त्यांने हिऱ्याचे कानातले दागिने चोरले होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या कानातल्यांची किंमत पाच लाख रुपये होती. संदीप हेगडे हा अर्पिता खानच्या घरगडी म्हणून काम करत होता.
Published on: May 18, 2023 07:23 AM
Latest Videos