हायकोर्टाच्या निर्णयाचे शासन तंतोतंत पालन करेल : उदय सामंत
ठाकरे गटाचे रवींद्र वायकर यांनी निधी वाटपात पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप या याचिकेतून मुंबई हायकोर्टात केला होता. त्यांच्या आरोपांची दखल घेत मुंबई हायकोर्टाने घेतली
मुंबई : मुंबई हायकोर्टाने निधी वाटपाबाबत राज्य सरकारला धारेवर धरत सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले. तसेच नव्या आर्थिक वर्षातील आमदार निधी वाटपाला स्थगिती दिली. त्यावरून उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सामंत यांनी, हा नियम जुनाच आहे, पण यावर जर न्यायालयाने निर्णय दिला असेल तर तो योग्य आहे. पण आमदार निधी हा जो आम्हाला मिळतो, त्याची विभागणी कशा पद्धतीने करायची, कुठे तो निधी खर्च करायचा याचा अहवाल घेऊन जर पुढचा वापरायचा असेल तर हा निर्णय चांगला आहे. हायकोर्टाच्या आदेशाची खात्री करूनच पुढे तो आमदार निधी वाटला जाईल. हायकोर्टाच्या निर्णयाचे शासन तंतोतंत पालन करेल
ठाकरे गटाचे रवींद्र वायकर यांनी निधी वाटपात पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप या याचिकेतून मुंबई हायकोर्टात केला होता. त्यांच्या आरोपांची दखल घेत मुंबई हायकोर्टाने गेल्या आर्थिक वर्षात कोणाला किती निधी दिला? याचे तपशील प्रतिज्ञापत्रावर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत