१२ वी परीक्षेवर बहिष्कार, प्रसंगी आत्मत्याग, का घेतला शिक्षकांनी हा टोकाचा निर्णय ?

१२ वी परीक्षेवर बहिष्कार, प्रसंगी आत्मत्याग, का घेतला शिक्षकांनी हा टोकाचा निर्णय ?

| Updated on: Feb 16, 2023 | 12:39 PM

कर्ज वाढले आहे, कौटुंबिक जबाबदारी आहे. तरीही सामाजिक भान ठेवून आम्ही काम करत आहोत. मात्र, आता आमची सहनशीलता संपली.

अहमदनगर : मोदी सरकारने कोविड काळात ऑनलाईन शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. आता सर्वच काम डिजिटल पद्धतीने करण्याचे आवाहन सरकार करत आहे. पण, हे काम आम्ही गेली २० वर्ष करत आहोत. कोरोना काळात सर्वात महत्वाची भूमिका आम्ही बजावली होती. तरीही आमच्यावर २० वर्ष उपाशी राहण्याची वेळ येत आहे. कर्ज वाढले आहे, कौटुंबिक जबाबदारी आहे. तरीही सामाजिक भान ठेवून आम्ही काम करत आहोत. मात्र, आता आमची सहनशीलता संपली. २० वर्ष विनावेतन काम करत आहोत. त्यामुळे सरकारने आमची २००१ पासून सेवा ग्राह्य धरावी आणि आम्हाला १०० टक्के वेतन अनुदान द्यावे अशी मागणी आयटी विभागाच्या शिक्षकांनी केली आहे. आमच्या मागण्या मान्य न केल्यास १२ वी च्या परीक्षेवर बहिष्कार घालण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.