Nandurbar | वसतिगृहाच्या प्रवेशासाठी लिपिकाची मागितली लाच
तळोदा आदिवासी (Trible) विकास प्रकल्पा अंतगत आसलेल्या आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहात प्रवेश मिळवून देण्यासाठी ५००० हजारची लाच घेताना नंदुरबार लाचलुचपत विभागाने रंगे हाथ अटक केली आहे.
मुंबई : तळोदा आदिवासी (Trible) विकास प्रकल्पा अंतगत आसलेल्या आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहात प्रवेश मिळवून देण्यासाठी ५००० हजारची लाच घेताना नंदुरबार लाचलुचपत विभागाने रंगे हाथ अटक केली आहे. तक्रारदार विद्यार्थ्याने(Student) तळोदा येथील आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. मात्र त्यांचे नाव यादीत न आल्याने आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात कार्यरत असलेल्या किशोर पावरा लिपिकाने पाच हजार रुपयांची लाच मागितली या संदर्भात विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून सापळा रचून लिपिक पावरा यांना पाच हजार रुपये स्विकारताना रंगे हाथ अटक करण्यात आली. यावरून आदिवासी (trible) विकास विभागाच्या वसतिगृहात प्रवेशासाठी सुरू असलेला सावळा गोंधळ समोर आला आहे. राज्याच्या आदिवासी विकास मंत्र्याच्या जिल्ह्यात विभागाच्या वसतिगृहात प्रवेशासाठी लाच मगतील्याचे प्रकरण समोर आल्याने खळबळ माजली आहे.