पुण्याच्या चांदनी चौकातील पूल अवघ्या 6 सेकंदात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला; महामार्गावरील वाहतूक अद्यापही ठप्प

पुण्याच्या चांदनी चौकातील पूल अवघ्या 6 सेकंदात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला; महामार्गावरील वाहतूक अद्यापही ठप्प

| Updated on: Oct 02, 2022 | 9:08 AM

पुण्याच्या चांदणी चौकातील पूल रात्री एकच्या सुमारास जमीदोस्त करण्यात आला. हा पूल पाडण्यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण तयारी आधीच करण्यात आली होती. 

पुण्याच्या (PUNE) चांदणी चौकातील पूल (Bridge) रात्री एकच्या सुमारास जमीदोस्त करण्यात आला. हा पूल पाडण्यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण तयारी आधीच करण्यात आली होती.  खबरदारी म्हणून काल रात्री 11 पासून मुंबई – बंगलोर महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर रात्री एकच्या सुमारास हा पूल पाडण्यात आला. ड्रिगर दाबताच अवघ्या सहा सेकंदात हा पूल जमीदोस्त झाला. मात्र हा पूल जरी पडला असला तरी त्याचा सांगडा शिल्लक राहिल्यानं आता तो हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. काल रात्री 11 पासून पुणे, मुंबई महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. सध्या या परिसरातील  राडारोडा हटवण्याचं काम सुरू असल्यानं वाहतूक बंदच ठेवण्यात आली आहे. स्फटोकांच्या मदतीने हा पूल पाडण्यात आला.

 

 

Published on: Oct 02, 2022 09:08 AM