बीड-परळी महामार्गावरील पूलच गेला वाहून, 48 तासांपासून वाहतूक ठप्प अन्…

| Updated on: Aug 26, 2024 | 12:39 PM

बीड जिल्ह्यात गेलया काही तासांपासून मुसळधार पावसाने नागरिकांना चांगलंच झोडपून काढलं आहे. सातत्याने पडणाऱ्या या मुसळधार पावसामुळे बीड-परळी महामार्गावरील पूल चक्क वाहून गेल्याचे पाहायला मिळत आहे. पांगरी येथील वाण नदीवर तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेला हा पूल शनिवारी पहाटे वाहून गेला.

Follow us on

बीड-परळी महामार्गावरील वाहतूक मागील 48 तासापासून ठप्प आहे.  परळी बीड महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आलं आहे. मात्र हे काम सुरू असतानाच बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने पांगरी येथील वाण नदीवरील पूलच वाहून गेल्याचा प्रकार समोर आले. पांगरी येथील वाण नदीवर तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेला पूल शनिवारी पहाटे वाहून गेला. त्यामुळे बीड-परळी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. हा पूल वाहून गेल्या घटनेनंतर प्रशासनाकडून पुन्हा या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात पूलाचे काम सुरू करण्यात आले आहे. याची पाहणी शरद पवार गटाचे नेते फुलचंद कराड यांनी केली. यावेळी त्यांनी संबंधित यश कन्स्ट्रक्शन आणि कार्यकारी अभियंत्यावर कारवाईची मागणी केली आहे. पावसाळ्यात हा पूल वाहून जाईल अशी शक्यता वर्तविण्यात आली होती, मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून कार्यकारी अभियंत्यावर देखील कारवाईची मागणी फुलचंद कराड यांनी यावेळी केली.