“…तर मी स्वत: फाशीवर जाईन”, लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर ब्रिजभूषण सिंह यांचं वक्तव्य”
भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात देशातील कुस्तीगिरांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. या आरोपांमुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे भारतातील कुस्तीगिरांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलनही छेडले आहे.
नवी दिल्ली: भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात देशातील कुस्तीगिरांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. या आरोपांमुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे भारतातील कुस्तीगिरांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलनही छेडले आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कुस्तीगिरांवतीने केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर ब्रिजभूषण शरण सिंह यांनी वक्तव्य केलं आहे. आरोप सिद्ध झाला तर स्वत: फाशीवर जाईन, असं ते म्हणाले.लैगिंक शोषणाच्या आरोपानंतर ब्रिजभूषण यांनी हे वक्तव्य केलं आहे.
Published on: May 31, 2023 04:08 PM
Latest Videos