Brujbhushan Singh On Raj Thackeray | राज ठाकरे माफी मागत नाही तोपर्यंत इकडे येऊ नये

Brujbhushan Singh On Raj Thackeray | राज ठाकरे माफी मागत नाही तोपर्यंत इकडे येऊ नये

| Updated on: May 10, 2022 | 10:46 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्यावर (Raj Thackeray Ayodhya Tour) भाजप खासदार बृजभूषण सिंह आक्रमक झाले आहेत. राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) जनतेची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली होती. या मागणीवर ते ठाम आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्यावर (Raj Thackeray Ayodhya Tour) भाजप खासदार बृजभूषण सिंह आक्रमक झाले आहेत. राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) जनतेची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली होती. या मागणीवर ते ठाम आहे. आता राज ठाकरे यांच्याविरोधात उत्तर भारतीयांनी जोरदार घोषणाबाजी अयोध्येत केली. ‘राज ठाकरे माफी मांगो’, ‘राज ठाकरे चूहा है’ अशा घोषणा यावेळी राज ठाकरेंविरोधात देण्यात आल्या. दरम्यान, राज ठाकरेंविरोधात आणि त्यांच्या कृत्यांविषयी मी आधीपासून बोलतोय आणि त्यांची निंदा करतोय, असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलंय. ते टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधींसोबत बोलत होते. राज ठाकरेंनी माफी मागितली, तर उत्तर भारतीय त्यांना माफही करतील, असंही ते म्हणाले आहेत. राज ठाकरेंच्या माफीच्या मागणीवर कायम राहत भाजप खासदार यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. दिल्लीतून फोन आले तरी आता आंदोलन मागे घेणं शक्य नाही, असंही ते म्हणाले आहेत.