बुलेट आणि त्याचा ठोका आवडणाऱ्यांसाठी फार महत्वाची बातमी; ”हा” बदल कराल तर होणार…
जगात असा अपवादानेच मानुस भेटेल जो म्हणेल मला बुलेट आवडत नाही. अशी याची लोकप्रिय आहे. मात्र याच्यावरून पोलीस प्रशासनाने दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे अनेक तरूणांच्या सह तरूणींमध्ये चिंतेचं वारं पसरलेलं आहे.
बुलढाणा : सध्या तरुणांमध्ये बुलेटची एक वेगळीच क्रेझ आहे. तसेच बुलेटची आताच नाही तर फार जुनी ओळख अनेकांना आहे. आधी या गाडीचा आवाज जरी आला तर लोक पागल व्हायचं आता तर ही अनेकांच्या हातात दिसत. जगात असा अपवादानेच मानुस भेटेल जो म्हणेल मला बुलेट आवडत नाही. अशी याची लोकप्रिय आहे. मात्र याच्यावरून पोलीस प्रशासनाने दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे अनेक तरूणांच्या सह तरूणींमध्ये चिंतेचं वारं पसरलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये बुलेटचे सायलेन्सर बदलून फटाके फोडण्याची मोठी क्रेझ वाढली आहे. आणि यातून निघणाऱ्या कर्नकर्कश आवाजामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास होत आहे. त्यातच खामगाव शहरात बुलेटची संख्याही वाढताना दिसत आहे. यामुळे आता पोलिसानीच आपले हात आणि पाय याप्रश्नाकडे वळवले आहे. शहर पोलिसांनी बुलेट मालकासह सायलेन्सरमध्ये छेडछाड करून देणाऱ्या गॅरेज चालकावर देखील आता कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे मोटार वाहन कायद्यानुसारच वाहने चालवावीत अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा देखील यावेळी पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला.