खामगाव खंडोबा यात्रा महोत्सव; बारा गाड्या ओढण्याची दीडशे वर्षांची परंपरा
श्रध्दा आणि भक्तीचा सोहळा असलेल्या या पुरातन पर्वाची अनेकांना ओढ लागून असते. त्यामुळे परिसरातील भाविक या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात
बुलढाणा : जिल्ह्यातील जलालपुरा येथे खंडोबाचा उत्सव मोठ्या उल्हासात पार पडला. खंडोबा मंदिरात चैत्र पौर्णिमा अर्थातच हनुमान जयंतीला 12 बैलगाड्या ओढण्याची दीडशे वर्ष जुनी पंरपरा आहे. गाडी ओढणाऱ्यांना गडकरी म्हटले जाते. त्यांचे विधिवत पूजन करून खामगाव शहरातून मिरवणूक काढली जाते. त्यापूर्वी गडकऱ्यांची हळद, माखणी सोहळा मंदिरात पार पडला जातो. बैलगाडी ओढण्यासाठी सात ते अकरा गडकरी असतात, सर्व धर्मीय नागरिक या उत्सवात सहभागी होत असतात. श्रध्दा आणि भक्तीचा सोहळा असलेल्या या पुरातन पर्वाची अनेकांना ओढ लागून असते. त्यामुळे परिसरातील भाविक या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात.
Published on: Apr 07, 2023 10:01 AM
Latest Videos