काँग्रेसचं जहाज भरकलेलं; विखे पाटीलांची राहुल गांधीवर ही टीका
राहुल गांधी हे प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीत भाष्य करतात असेही यावेळी विखे पाटील म्हणाले.
बुलढाणा : राज्यासह देशात राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्यावरून सध्या जोरदार निषेध व्यक्त केला जात आहे. राज्यातील सत्ताधारी भाजपनेही यावरून सभागृहात तसेच रस्त्यावर उतरत हल्लाबोल केला. त्यावरून राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेससह राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. आपल्या विरोधात निकाल गेला तर सत्तेचा दुरुपयोग आणि आपल्या बाजूने निकाल लागला तर न्यायव्यवस्थेवर विश्वास अशी भूमिका काँग्रेसची आहे. ही राजकारणातली दुटप्पी भूमिका आहे. काँग्रेसचे जहाज भरकटलेले आहे, अशी टीका राहुल गांधी यांच्या प्रकरणावरून केली आहे. तर राहुल गांधी हे प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीत भाष्य करतात असेही यावेळी विखे पाटील म्हणाले.
Published on: Mar 27, 2023 09:12 AM
Latest Videos