शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वाभिमानीचा लढा; पोलीस कस्टडीतही रविकांत तुपकर यांचं अन्नत्याग आंदोलन सुरूच

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वाभिमानीचा लढा; पोलीस कस्टडीतही रविकांत तुपकर यांचं अन्नत्याग आंदोलन सुरूच

| Updated on: Feb 12, 2023 | 7:43 AM

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे अन्नत्याग आंदोलन करत आहेत. पोलीस कस्टडीतही ते आंदोलन करत आहेत. पाहा व्हीडिओ...

बुलढाणा : शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरु आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे अन्नत्याग आंदोलन करत आहेत. पोलीस कस्टडीतही रविकांत तुपकर यांचं अन्न त्याग आंदोलन सुरूच आहे. काल दुपारी 12 वाजल्यापासून हे आंदोलन सुरू आहे. बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आंदोलन केलं जातंय. दरम्यान काल दुपारी रविकांत तुपकर यांनी वेशांतर करत स्वाभिमानीच्या आंदोलनात सहभाग घेतला. काल दुपारी तुपकर यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.