बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा होताच इंदापुरात भिर्रर्रर्र….; पहा शर्यतीचा थरार
बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला. न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवली होती. त्यामुळे या निर्णयाने ग्रामीण महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे. यानंतर आता इंदापुरात प्रथमच बैलगाडा शर्यत रंगल्या.
पुणे : बैलगाडा शर्यतीवर सुप्रीम कोर्टाने अंतिम निर्णय सुनावला. बैलगाडा शर्यतीवर बंदी नाही असा अंतिम निकाल सुप्रीम कोर्टाने दिला. त्यामुळे बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला. न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवली होती. त्यामुळे या निर्णयाने ग्रामीण महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे. यानंतर आता इंदापुरात प्रथमच बैलगाडा शर्यत रंगल्या. पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील न्हावी गावात या शर्यत झाल्या. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज बैलगाडा शर्यतीचा थरार पार पडलाय. यात सोलापूर, पुणे, सांगली, सातारा येथून 113 बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला होता. बैलगाडा शर्यतीचा हा थरार पाहण्यासाठी बैलगाडा शर्यत प्रेमींनी अलोट गर्दी केली होती.
Published on: May 22, 2023 07:49 AM
Latest Videos