हुर्रररररर नव्हं…. डार डार…. सांगलीत रंगली ट्रॅक्टर डंपिंग रिव्हर्स स्पर्धा; थराच थरार…
सांगलीच्या मैदानात हुर्ररररररच्या ऐवजी डार डारच्या आवाजसह हुर्या करणाऱ्या गावकऱ्यांचा येत होता. निमित्त होतं सद्गगुरू जंगली महाराज यात्रेनिमित्त पहिल्यादाच रेठरेहरणाक्ष येथे भव्य ट्रॅक्टर डंपिंग रिव्हर्स स्पर्धेच.
सांगली : बैलगाडी शर्यती बंदी आली तेंव्हा शेतकरीवर्गासह बैलगाडी चालक मालक व प्रेक्षकांच्यात यांच्यात प्रचंड नाराजी होती. मात्र यावेळी सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवली आणली सगळीकडे हुर्ररररररचा आवाज घुमू लागला. मात्र सांगलीच्या मैदानात हुर्ररररररच्या ऐवजी डार डारच्या आवाजसह हुर्या करणाऱ्या गावकऱ्यांचा येत होता. निमित्त होतं सद्गगुरू जंगली महाराज यात्रेनिमित्त पहिल्यादाच रेठरेहरणाक्ष येथे भव्य ट्रॅक्टर डंपिंग रिव्हर्स स्पर्धेच. सांगलीच्या रेठरेहरणाक्ष गावात सदगुरु जंगली महाराज याची यात्रा सुरू आहे. या यात्रेनिमित्त गावात आगळी वेगळी आणि पहिल्यांदाच भव्य ट्रॅक्टर डंपिंग रिव्हर्स स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून आणि इतर जिल्ह्यातून 74 ट्रॅक्टर सहभागी झाले होते. ही ट्रॅक्टर डपिंग रिव्हर्स स्पर्धा, 600 मीटर इतकी लांब होती. या स्पर्धेसाठी 6 बक्षीस ठेवण्यात आली होती. पाहिले बक्षीस 10 हजार तर दुसरे 7 हजार आणि तिसरे बक्षीस 5 हजार असे होते. या स्पर्धेत कराडच्या बाबर माची यांनी 1 नंबर काढला. ही स्पर्धा पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. या स्पर्धेचे आयोजन विश्वजित मोरे, विकास मोरे, सुशांत मोरे, आणि धनंजय गर्जे यांनी केले होते.