Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra ST Bus Incident : IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं

Maharashtra ST Bus Incident : IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं

| Updated on: Mar 23, 2025 | 6:17 PM

E-Shivneri Bus Driver Terminated For Watching Cricket : बस चालवत मोबाईलवर क्रिकेट मॅच बघणाऱ्या एका खाजगी चालकावर एसटी प्रशासनाने बडतर्फ करण्याची कारवाई केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानंतर ही कारवाई झाली आहे.

बस चालवत मोबाईलवर क्रिकेट मॅच बघणाऱ्या एका खाजगी चालकाला एसटी प्रशासनाने बडतर्फ करत संबंधित खाजगी कंपनीला 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार ही कारवाई एसटी महामंडळाने केली आहे.

दादर येथून स्वारगेट (पुणे) साठी निघालेल्या खाजगी ई-शिवनेरी बसमधील चालक रात्री लोणावळाजवळ बस चालवत क्रिकेट मॅच पाहत असल्याचा प्रकार 21 मार्च रोजी घडला होता. संबंधित बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी याचे चित्रीकरण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवले. याबाबत मंत्री सरनाईक यांनी तातडीने एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार एसटीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी संबंधित खाजगी संस्थेच्या चालकास प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बेशिस्त वाहनं चालवल्या प्रकरणी बडतर्फ केले असून संबंधित खाजगी संस्थेला 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Published on: Mar 23, 2025 06:17 PM