‘त्यांच्या मनात दिल्लीच्या सत्तेविषयी भीती होती’; संजय राऊत यांचा रोखठोकमधून राष्ट्रवादीवर निशाना

‘त्यांच्या मनात दिल्लीच्या सत्तेविषयी भीती होती’; संजय राऊत यांचा रोखठोकमधून राष्ट्रवादीवर निशाना

| Updated on: Jul 23, 2023 | 10:20 AM

यावेळी बैठकीला जाण्याआधी झालेल्या एका भेटीवरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचले आहे. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाना साधला आहे.

मुंबई, 23 जुलै 2023 | काही दिवसांपुर्वीच विरोधी पक्षांची बैठक बंगळुरूमध्ये तर सत्ताधारी भाजप प्रणित मित्र पक्षांची बैठक दिल्लीत पार पडली. यावेळी बैठकीला जाण्याआधी झालेल्या एका भेटीवरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचले आहे. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाना साधला आहे. राऊत यांनी यांनी यावेळी सामनाच्या रोखठोक सदरातून मुंबईतील एका हॉटेलात राष्ट्रवादीच्या नेत्याचा किस्सा सांगितला असून त्यातून दावा केला आहे. यावेळी त्यांनी, आम्ही बंगळुरात निघाल्याचे सांगताना, तेथे जाऊन आता काय साध्य होणार? असा सवाल त्या नेत्याने केल्याचं म्हटलं तर “काय होणार? ते शेवटी जनताच ठरवेल. मोदी ज्यांना स्वत:चे वैयक्तिक शत्रू समजतात. त्या सगळ्या देशभक्त पक्षांचे ऐक्य व्हावे, त्यांचे नेते एकत्र राहावेत अशी संपूर्ण देशाची इच्छा आहे. त्यांचा तुम्ही भ्रमनिरास केलात असे त्यांना सांगितलं तर विरोधी पक्षांचे ऐक्य आता कशासाठी? या त्या नेत्याच्या प्रश्नावर “मोदी-शाहांचा पराभव करण्यासाठी!” तर चित्र चांगले नाही, पण आम्हाला चक्की पिसायला जायचे नाही… त्यामुळे मोदी हवेत.” असे ते म्हणाले.

Published on: Jul 23, 2023 10:20 AM