: देशात 7 ठिकाणी विधानसभा पोटनिवडणूक जाहीर; मात्र बापट, धानोरकरांच्या जागेवर संभ्रम?
देशातल 7 राज्यांमधील रिक्त झालेल्या विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. 5 सप्टेंबर रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. तसेच या निवडणुकांचे निकाल 8 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहेत.
नवी दिल्ली, 09 ऑगस्ट 2023 | देशातल 7 राज्यांमधील रिक्त झालेल्या विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. 5 सप्टेंबर रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. तसेच या निवडणुकांचे निकाल 8 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ, झारखंड आणि उत्तराखंड मध्ये प्रत्येकी एका जागेसाठी आणि त्रिपुरामध्ये दोन जागांसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. पण महाराष्ट्रात पुणे आणि चंद्रपूर लोकसभा मतदार संघांच्या जागा रिक्त आहेत. मात्र पोटनिवणुकीत महाराष्ट्रातील दोन्ही मतदार संघाचे नाव नाही. गिरीश बापट यांच्या निधनाने पुण्याची जागा रिक्त झाली असून बाळू धानोरकर यांच्या निधनामुळे चंद्रपूर लोकसभेची जागा रिक्त आहे.
Published on: Aug 09, 2023 10:54 AM
Latest Videos