खाते वाटपाचा तिढा सुटला, कुणाला कोणतं खातं मिळणार? पाहा संभाव्य यादी

खाते वाटपाचा तिढा सुटला, कुणाला कोणतं खातं मिळणार? पाहा संभाव्य यादी

| Updated on: Jul 14, 2023 | 4:20 PM

अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर गटातील 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, अद्यापही त्यांचं खातेवाटप झालेलं नाही. मात्र, आता खातेवाटपाबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

मुंबई: अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर गटातील 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, अद्यापही त्यांचं खातेवाटप झालेलं नाही. मात्र, आता खातेवाटपाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंत्र्यांच्या खातेवाटपाची यादी घेऊन राज्यपालांकडे पोहचले आहेत. अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास शिंदे गटाने जोरदार विरोध केला होता. मात्र, आता खाते वाटपाचा तिढा सुटला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांनाच अर्थ खातं देण्यात आलं आहे. तर धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खाते देण्यात आले आहे. शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीच्या आणखी कोणत्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा