Special Report | मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर; शिंदे गटाकडून अनेक जण मोठ्या कॅबिनेट पदासाठी इच्छूक
ठाकरे सरकारमधून शिंदे गटात गेलेल्या स्वतः शिंदेंसहीत गुलाबराव पाटील, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, संजय राठोड हे कॅबिनेट मंत्री राहिले होते. त्यामुळं या नेत्यांना मंत्रिमंडळात पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.. पण भरत गोगावले, संजय शिरसाट, दीपक केसरकर आणि प्रताप सरनाईक यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
मुंबई : सुप्रीम कोर्टातल्या याचिकेवरची आजची सुनावणी पुढे गेलीय. त्यामुळे उद्या होणारा मंत्रिमंडळ विस्तारही( cabinet expansion) लांबणीवर गेलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीनं दिल्लीला रवाना झाल्यानं या चर्चांना उधाण आलंय. ठाकरे सरकारमधून शिंदे गटात गेलेल्या स्वतः शिंदेंसहीत गुलाबराव पाटील, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, संजय राठोड हे कॅबिनेट मंत्री राहिले होते. त्यामुळं या नेत्यांना मंत्रिमंडळात पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.. पण भरत गोगावले, संजय शिरसाट, दीपक केसरकर आणि प्रताप सरनाईक यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
2014 च्या फडणवीस सरकारमध्ये गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, जयकुमार रावल, अनिल बोंडे, राधाकृष्ण विखे-पाटील, आशिष शेलार, संजय कुटे हे कॅबिनेट मंत्री होते. यातले अनिल बोंडे आता राज्यसभेवर गेले आहेत. पण इतरांना महाराष्ट्रात मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. यावेळी शिंदे गटाकडून अनेक जण मोठ्या कॅबिनेट पदासाठी इच्छूक आहेत.
गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांना गेल्यावेळच्या पाणीपुरवठा या खात्यापेक्षा मोठं खातं मिळण्याची आशा आहे. बच्चू कडूंना जलसंधारण किंवा ग्रामविकास खातं हवंय किंवा स्वतंत्र अपंग कल्याण मंत्रालय स्थापन करण्याची मागणीही त्यांनी केलीय. त्यामुळे भाजपच्या काही नेत्यांना मंत्रीपदासाठी वेटिंगवर राहावं लागण्याची शक्यता आहे. मागच्या काही दिवसात इतर राज्यांमध्ये भाजपने केलेले मंत्रीमंडळ विस्तार त्याचंच उदाहरण आहे. भाजपनं तिथं अनेक दिग्गजांना धक्का देत नव्या चेहऱ्यांना संधी दिलीय.