Uday Samant | ‘ पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रीमंडळ विस्ताराला मुहुर्त’, उदय सामंत यांनी केला खुलासा
Uday Samant | येत्या पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रीमंडळ विस्ताराला मुहुर्त लागणार असल्याचा खुलासा कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.
Uday Samant | येत्या पावसाळी अधिवेशनानंतर (Assembly session) मंत्रीमंडळ विस्ताराला (Cabinet expansion )मुहुर्त लागणार असल्याचा खुलासा कॅबिनेट मंत्री उदय सामंत (Uday Samant)यांनी केला आहे. गेल्या मंत्रीमंडळात उदय सामंत यांच्यावर उच्च तंत्रशिक्षण खात्याची जबाबदारी होती. शेवटच्या क्षणापर्यंत ते शिवसेनेत होते. डॅमेज कंट्रोलसाठी आयोजीत शिवसेनेच्या बैठकीत ही ते हजर होते. त्यानंतर ते विमानाने थेट गुवाहाटी येथे पोहचले आणि त्यांनी शिंदे गट जवळ केला. त्यामुळे शिवसेना मोठा धक्का बसला होता. सत्तांतरानंतर आज मंगळवारी, 9 ऑगस्ट रोजी मंत्रीमंडळ विस्तार झाला. यामध्ये शिवसेनेच्या 9 आणि भाजपच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांना कॅबिनेट पदाची लॉटरी लागली. काही आमदार आणि अपक्ष नाराज असल्याचा प्रश्न विचारला असता, सामंत यांनी पावसाळी अधिवेशनानंतर लवकरच मंत्रीमंडळाचा आणखी विस्तार होईल आणि त्यात अनेकांना अजून संधी मिळेल असे भाष्य केले. त्यामुळे आता नाराजी दूर करण्यासाठी पुन्हा एकदा मंत्रीमंडळाचा विस्तार होणार हे स्पष्ट आहे.