नाशिक पाठोपाठ आता ‘या’ जिल्ह्यातील पक्ष कार्यालयावरून राष्ट्रवादीतील दोन नेते आमनेसामने

नाशिक पाठोपाठ आता ‘या’ जिल्ह्यातील पक्ष कार्यालयावरून राष्ट्रवादीतील दोन नेते आमनेसामने

| Updated on: Jul 10, 2023 | 9:26 AM

हे कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या मालकीचे असून काही दिवसांसाठी त्यांनी ते वापरायला दिले होते. कधीकाळी याच कार्यालयात येण्यासाठी ईश्वरलाल जैन यांना मज्जाव करण्यात आला होता.

जळगाव : जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय आहे. हे कार्यालय काही नेत्यांनी बळकावून ठेवले आहे. हे कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या मालकीचे असून काही दिवसांसाठी त्यांनी ते वापरायला दिले होते. कधीकाळी याच कार्यालयात येण्यासाठी ईश्वरलाल जैन यांना मज्जाव करण्यात आला होता. ईश्वरलाल जैन यांचे सुपुत्र माजी आमदार मनीष जैन अजित पवार गटासोबत आहेत. त्यामुळे जे नेते या कार्यालयावर आपला हक्क गाजवत आहेत ते बलाढ्य आहेत. त्यांनी स्वतः दुसरे कार्यालय पक्षासाठी बांधून द्यावे व पर्यायी व्यवस्था करावी असं आव्हान कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांनी दिले आहे. अनिल पाटील यांचा बोलण्याचा रोख हा माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर होता. दरम्यान, बहुतांशी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय हे वेल्फेअर नावाने आहेत. परंतू जळगावचे कार्यालय हे जैन यांच्याचं मालकीचे आहे ते आम्ही ताब्यात घेऊ असाही अनिल पाटील यांनी इशारा दिला आहे .

Published on: Jul 10, 2023 09:26 AM